Sunday, July 19, 2009

उतरणरात्र वैर्याची होती,हल्ली दिस ही तो पाहत आहे,

पात्रात गंगेच्या धारा पाश्चीमात्य वाहत आहे.

पाहिले अखेरचे जेव्हा एक प्रेत तरंगत होते,

निम भरल्या काठा भवती, आक्रोश दिवंगत होते.किल्ल्यात बुरुजावरती बाजार मांडलॆ त्यांनी

वाघाच्या रक्तावरती आज सरडे पॊसत आहेत.

नीतीच्या बेलावरती तत्वांचे सांडले पाणी,

तलवारी करूनि म्य़ान ते ढाला बडवित आहेत.निरभ्र आसमंती मेघ आमचे बरसत आहेत,

सिंधूत गलबते आमुचि,वरुण ते हाकत आहेत.

रात्र वैर्याची होती,हल्ली दिस ही तो पाहत आहे,

पात्रात गंगेच्या धारा पाश्चीमात्य वाहत आहे..

1 comment:

Anonymous said...

bahot badhiya.......tujhi vedana kalali........