Saturday, September 19, 2009

उरवशी


डोळे तुझे मज बाटविती,

अन नभ मनी मेघ दाटविती,

झीरपता स्मित द्र्व्य तुझे,

माळ रानी गंध दरवळती.अंतरास गीत पैजण तुझे,

अमॄतात मद्य रस विरघळती.

धुंदी अशी मद्याची त्या

मदिरेस जल ती भासविती.उदासीन मैफ़िलीत या,

षट्कोनी आलाप तुझे.

गळता तटबंदी वैरागी,

भगवे वस्त्रही भरकटती.

2 comments:

primus inter pares said...
This comment has been removed by a blog administrator.
Sanket said...

Hey heartfelt gratitude vineet