Tuesday, December 22, 2009

आईरण रणत ऊन अन तापलेले कण

ओला गारवा देते ती सर

सरीस नाही सर तुझ्या मायेची

शीतल प्रेमळ तुझ्या छायेचीघडीव ऐरण अन कठोर घण

तसे घडविशी छाव्याचे मन

मातीची मूर्ती मूर्तीस भरण

ओल्या मातीस देशी वळणसत्यात विखुरले मायेचे कण

मायेत सत्य जीवन मरण

अनंत सोहळी चैतन्यमय

भासे तुझ्या मायेचा सण

No comments: