Tuesday, December 22, 2009

कट्टारवी अस्तास मैफ़ील जमे

गप्पांसाठी समा बने

थकलेल्या दिवसाकाठी

सांज सखी ती गोड हसेसिगरेट,कटींग अन दाणे

घेउन मावळा सज्ज असे

ंमास्तर,साहेब अन नावडत्यास

येथे शाब्दीक वार बसेवारांचे या होइ समर्थन

प्रत्येकास एक शतरु असे

क्षीतीजावरती फ़डकवून भगवा

निसर्ग राजा संगे बसेतुंबलेला रोष नीसरता

प्रत्येक जण गोड हसे

क्षीतीजावर कृष्ण अवतरता

टींगल लीलेस बंद नसे

हास्याचे उडती कारंजे

अन शब्दांचे चतुर झरेविनोदांची ही प्रयोगशाळा

रोज नवीन शोध घडॆ

हास्याचा मानव उपासक

भक्तांची नित्य बैठक जमेक्षीण्लेल्या मनास दैवत

नाक्यावरील कट्टा असे

No comments: